
नाशिक। दि. ७ नोव्हेंबर २०२५: धोत्रे खून प्रकरणातील फरार संशयित सचिन दहिया याला अटक करण्यात आली. गुंडाविरोधी पथकाने मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील गिंजारा गाव येथे ही कारवाई केली. संशयित मार्बल फिटिंगचे काम करत नातेवाइकांकडे लपून रहात होता.
पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे यांना धोत्रे खुनाच्या गुन्ह्यातील फरार संशयित मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात मार्बल फिटिंगचे काम करत असल्याची माहिती मिळाली.
पथकाचे राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी सतना जिल्ह्यातील नागौदी येथील दोन बांधकाम साइटवर जाऊन त्याची चौकशी केली व सापळा रचला. बांधकाम साइटवरील मजुरांकडून माहिती घेतली. तो गिंजारा गावात नातेवाइकाकडे रहात असलेल्या ठिकाणी शोध घेतला. पथकाला बघून संशयिताने शेतात धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.
![]()

