🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: सराईत गुन्हेगार हसन कुट्टी गजाआड; एकाच वेळी तीन गंभीर चोरीचे गुन्हे उघड !

नाशिक (प्रतिनिधी): रविवारी दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळच्या सुमारास गुंडा विरोधी पथकाच्या कारवाईत सराईत गुन्हेगार हसन आमजा कुट्टी (वय ४६, रा. नवनाथ नगर, शेवाळे चाळ, पेठरोड, पंचवटी, नाशिक) यास पेठरोड परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण यांनी तात्काळ कारवाई करत पेठरोड येथील दत्तनगर भागात सापळा रचून आरोपीस अटक केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

हसन कुट्टी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खालील चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली:

  1. म्हसरूळ पोलीस ठाणे, गु. र. क्र. ३६/२०२५ – दिनांक १०/०२/२०२५ रोजी न्यु उत्तम हिरा (घुंगरु) रेस्टॉरंट व परमिट रुम, पेठ रोड येथे ६९,१२० रुपयांचा विदेशी दारू व रोख मुद्देमाल चोरीस.
  2. म्हसरूळ पोलीस ठाणे, गु. र. क्र. २८५/२०२४ – दिनांक १८/११/२०२४ रोजी त्याच हॉटेलमध्ये २ लाख रुपयांची चोरी.
  3. मुंबईनाका पोलीस ठाणे, गु. र. क्र. ११०/२०२५ – दिनांक ०२/०४/२०२५ रोजी हॉटेल रसोई, मुंबईनाका येथे ४६,००० रुपयांची विदेशी दारू व रोख रक्कम चोरीस.
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'त शनिवारी (दि. २१) ‘स्वर-सावाना’चे १९ वे पुष्प; गायिका आयेशा मुखर्जी यांचे सादरीकरण

असे एकूण तीन गुन्हे हसन कुट्टी याने केल्याचे उघड झाले असून त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व ग्रामीणमध्ये एकूण १७ मालाविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, प्रविण चव्हाण, भुषण सोनवणे, अशोक आघाव यांनी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुटणाऱ्या इराणीला अटक; १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता असून पुढील तपास सुरु आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790