नाशिक: दोन संशयितांकडून अडीच लाखांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त; चार गुन्ह्यांची उकल

नाशिक। दि. ३ जुलै २०२६: गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३च्या पथकाने प्रभावी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून २ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, संशयितांना पुढील तपासासाठी आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भाडेकरू बनून घरफोडी करणारे 'बंटी-बबली' अटकेत; बोईसरमधून जेरबंद, २४.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या दुचाकींच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिस अंमलदार भगवान जाधव आणि प्रकाश बोडके यांना महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीची मोटारसायकल विक्रीच्या उद्देशाने एक संशयित गोल्फ क्लब मैदान परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवेला प्रारंभ

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मोतीलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप सगळे तसेच पोलिस अंमलदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भगवान जाधव आणि चारूदत्त निकम यांच्या पथकाने कारवाई करत बालेश नरहरी देशमुख (वय ३८, रा. नैताळे, ता. निफाड) आणि अमोल पांडुरंग अमोदे (वय ३५, रा. पांगरी, ता. सिन्नर) यांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पावसाची रिपरिप; वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

चौकशीदरम्यान संशयितांकडून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे आडगाव पोलिस ठाण्यातील दोन, तसेच वावी (नाशिक ग्रामीण) आणि शिर्डी पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

या तपासात तांत्रिक विश्लेषण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790