नाशिक (प्रतिनिधी): भावाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या संशयातून भाऊ आणि त्याच्या मित्राने एकाचा विटाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २) पहाटे महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रतापनगर, फुलेनगर येथे उघडकीस आला.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार तासांत दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली. संजय तुळशीराम सासे (४०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रूपाली सासे यांच्या तक्रारीनुसार, पती घराच्या पाठीमागे म्हसोबा मंदिराकडे गेले होते. पहाटे दोनला घरामागे कुणीतरी डोक्यात विटा मारून त्यांचा खून केला. संशयित विशाल क्षीरसागर याच्या भावाचा २९ एप्रिल २०२४ रोजी मृत्यू झाला होता.
खून केल्यानंतर संशयित विशाल कैलास क्षीरसागर व धीरज मनोहर सकट (रा. विजय चौक, फुलेनगर) हे दोघे संशयित अवधूतवाडीतील गणपती मंदिराच्या छतावर लपून बसल्याची माहिती मिळाली. तेथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
![]()

