नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. तडीपार गुंडाला जेलरोड परिसरातून अटक करण्यात आली.
हितेश सुभाष डोईफोडे (२५, रा. साने गुरुजी नगर, जेलरोड, नाशिकरोड) असे संशयित तडीपार गुंडाचे नाव आहे. हितेश यास शहर – जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले होते. युनिट दोनचे अंमलदार शंकर काळे यांना तडीपार गुंड हितेश जेलरोड परिसरात असल्याची खबर मिळाली होती.
याबाबतची माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेनुसार सहायक उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, प्रकाश भालेराव, विजय वरंदळ, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, सोमनाथ जाधव, प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने सराईत गुंड व तडीपार हितेश यास जेलरोड परिसरातील महाजन हॉस्पिटलसमोरून सापळा रचून अटक केली. तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करून त्यास नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, पोलीस हवालदार शंकर काळे, प्रकाश भालेराव, विजय वरंदळ, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव आणि प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने केली.