नाशिक: युवकाचा डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक !

नाशिक (प्रतिनिधी): शहरात ‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोष सुरु असताना उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच सराईत गुन्हेगार मित्रांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे (३४, रा. क्रांतीनगर) असे मृताचे नाव आहे.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली होती. दिलेल्या फिर्यादीप्रमाणे लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिझवान काझी (दोघे रा. क्रांतीनगर) यांनी त्याला सोबत नेले. ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन ते आले. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेल्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून कुरापत काढून शिवीगाळ केली व लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला.

🔎 हे वाचलं का?:  हिट अँड रन: राणेनगर उड्डाणपुलाजवळ कारच्या धडकेत मजूर दाम्पत्याचा मृत्यू

यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या हल्ल्यानंतर हल्लेखोर दुचाकीने फरार झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शाखेची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली.

याप्रकरणी मृताच्या चुलत भावाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करत असतांना पोलीस हवालदार प्रशांत मरकड व विशाल काठे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या प्रकरणातील आरोपी शुभम मिरके व त्याचे साथीदार फुलेनगर (पेठ रोड) भागात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ऑनलाइन सट्टा रॅकेट उद्ध्वस्त, पाच जण अटकेत

त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने दोन पथके तयार करून सापळा रचला. पेठ रोड भागात आरोपींचा शोध घेत असतांना शुभम विठ्ठल मिरके (वय: २१, रा. क्रांती नगर, उंटवाडी रोड), अरुण बापू वळवी (वय: २१, क्रांती नगर, उंटवाडी रोड) आणि रिझवान रईसउद्दीन काझी (वय: २९, रा. क्रांती नगर, उंटवाडी रोड) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा खून त्यांचा साथीदार गणेश भावसार याच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा' अंतर्गत 30 जून रोजी 'जागेवर निवड संधी'चे आयोजन

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790