नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गंजमाळ भागात एमडीची विक्री करणाऱ्या दोघांना क्राईम ब्रांच युनिट १ ने अटक केली आहे.
नाशिक शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तसेच सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. क्राईम ब्रांच युनिट १ चे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत फारुख शेख आणि महेश शिरोळे यांच्याकडे अंमली पदार्थ असून ते पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनातून म्हसोबा वाडी समोरील मनपा गार्डन, गंजमाळ या ठिकाणी एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यामुळे पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला. यावेळी एमडी विक्री करतांना फारुख शेख (वय: ३३, राहणार: श्रमिकनगर, गंजमाळ, नाशिक) आणि महेश उर्फ नाना दत्तात्रय शिरोळे (वय: ४८, राहणार: हनुमान मंदिराजवळ, शिवाजीनगर, इगतपुरी) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यापैकी फारुख शेख याच्या अंगझडतीत १५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम एमडी तसेच मोबाईल आणि महेश दत्तात्रय शिरोळे याच्या अंगझडतीत ७५,००० रुपये किमतीची एमडी तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन असा एकूण २,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे शाखा) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माळोदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, प्रदीप म्हसदे, पोलीस अंमलदार राजेश राठोड, विलास चारोस्कर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, राहुल पालखेड, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, रामा बर्डे, अनुजा येवले, समाधान पवार यांच्या पथकाने केली आहे..