नाशिक। दि. ३० ऑगस्ट २०२५: पायी जाणाऱ्या वृद्धाला आवाज देत थांबवून आम्ही अॅन्टी करप्शनवाले आहोत असे सांगून येथे महिलेला चाकू लावला आहे. तुमची बॅग तपासायची आहे असे सांगून बॅग तपासण्याचा बहाणा करत दोन अंगठ्या, रोकड लांबवल्याचा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला.
इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि आनंदराव सोनार (६६ रा. शिंदखेडा, धुळे हल्ली रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी ३ वाजता पाथर्डी फाटा कडून पत्नी सोबत पायी जात असताना एक इसम जवळ आला आणि म्हणाला काका तुम्हाला केव्हाचा आवाज देत आहे. तुम्हाला ऐकायला आले नाही का?
तुम्ही इकडे या असे सांगून बाजूला बोलवले, आम्ही अँन्टी करप्शन वाले आहोत इथे एका महिलेला चाकू लावला आहे. आम्हाला तुमची बॅग तपासायची आहे. असे बोलून बॅग तपासणीचा बहाणा करत बॅगेत ठेवलेल्या दोन अंगठ्या आणि रोकड हातचलाखीने लंपास केली. पुढील तपास पोलिस तपास करत आहे. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २७२/२०२५)
शहरात तोतया पोलिसांचा वाढता वावर वृद्धांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांकडून अद्यापही एकही तोतया पोलिस पकडला न गेल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.