नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला तुझ्यासाठी बायकोला सोडून देईल, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अतिप्रसंग केल्याप्रकरणी बलात्कार व पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळालीगाव येथील अल्पवयीन मुलगी ही आपल्या आजीकडे राहत असून, ती जवळच राहणाऱ्या मावस बहिणीकडे काही महिन्यांपूर्वी गेली असता तिथे सुशांत बच्चू पराडे (३०, रा. इगतपुरी) याच्याशी ओळख झाली. सुशांत याने इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी चॅटिंग करून तिचा विश्वास संपादन करीत मी तुझ्यासाठी बायकोला सोडून देईल, असे सांगितले.
तुझे वय पूर्ण झाल्यावर लग्न करेल, असे सांगून त्या अल्पवयीन मुलीला त्र्यंबकेश्वर व मुक्तिधामजवळील लॉजवर घेऊन जात वारंवार तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात सुशांत पराडे याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.