नाशिक। दि. २८ सप्टेंबर २०२५: हरवलेला मोबाइल हॅक करत मोबाइल बँकिंगच्या आधारे पाच दिवसांत ८.७६ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. गहाळ तक्रारीनंतर बँक व्यवहार थांबवत २.५० लाखांची रक्कम होल्ड करत पोलिसांनी तक्रारदाराला दिलासा दिला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी कोंडाजी गोवर्धने (वय: ६१, रा. विहितगाव) ८ सप्टेंबरला बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. तेथे त्यांचा मोबाइल गहाळ झाला. पोलिसांत मोबाइल गहाळ झाल्याची तक्रार दिली. पाच दिवसांनी त्याच नंबरचे सिमकार्ड घेतले. मात्र तोपर्यंत मोबाइल हॅक करत आठ दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन २२ ट्रान्झेंक्शन करत खात्यातून ८ लाख ७६ हजारांची रक्कम काढून घेतली.
वरीष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी तक्रारीची दखल घेत संबंधीत बँकेला इ-मेलद्वारे कळवत २.५० लाखांचा व्यवहार थांबवला. याप्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४१७/२०२५)
![]()

