🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

रुमाल खरेदीचा बहाणा; दुकानदार महिलेचे ६० हजारांचे मंगळसूत्र खेचले

नाशिक। दि. १३ फेब्रुवारी २०२६: दोन अनोळखी इसमांनी दुकानात नविन रुमाल घरेदी करण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याचे पोत खेचून पोबारा केला. पळसे येथे एका साडी विक्री दुकानात हा प्रकार घडला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  रेरा बंद व्हायला हवा, याने पीडितांऐवजी कर्जबुडव्या बिल्डरांना मदत : सुप्रीम कोर्ट

सुनिता दौंड रा. पळसे यांनी तक्रार दिली. त्यांचे साडीचे दुकान आहे. दुपारी ४.३० वाजता त्यांच्या दुकानात काळ्या रंगाच्या दुचाकीहून दोघे आले. एकाने तोंडाला काळ्या रंगाचा मास्क काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला इसम दुकानात आला. रुमाल आहेत का विचारले, रुमालाचे कलर दाखवण्यास सांगीतले. इसम रुमाल बघत असतांना दौंड या कामात व्यस्त असल्याची संधी साधून संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली. काही कळण्याच्या आत पोत खेचून दुकाना समोर आधीच तयार असलेल्या त्याच्या मित्राच्या दुचाकीवर पाठीमागे बसून पळून गेले. पोलिस पुढील तपास करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790