ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल

ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

नाशिक (प्रतिनिधी): कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

क्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज पार पडले. त्यावेळी ते पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  कोविडची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनविल आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मुलीच्या वादातून मित्राचा खून करण्याची तयारी; ९ कोयते, चॉपरसह सहा अल्पवयीन मुले ताब्यात

कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे.

रिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्स साठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे.

रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे.कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच  नाही याची काळजी सर्वांना घ्यावी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्व संस्था संघटना काम करतआहेत, समाजिक दायित्व  म्हणून हे काम सदैव कायम ठेवाण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार

महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रेडाईने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून घेतलेलं हे पाऊल अतिशय महत्वाच आहे. क्रेडाईने उभारलेलं कोविड केअर सेंटर हे अतिशय सोयीं सुविधा युक्त असून रुग्णांना याठिकाणी आल्यानंतर चांगले उपचार मिळतील. नाशिक शहरातुन कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रित काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिकच्या स्लम भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनीच्या परिसरात तसेच सोसायटी परिसरात रुग्ण आढळत आहे.

हे ही वाचा:  नाशिकरांनो काळजी घ्या: उन्हाचा तडाखा; पारा थेट ३९ अंशाच्या पुढे !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथके काम करत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार पुणे मुंबईच्या धर्तीवर ठक्कर डोम येथे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी उपचारासोबत रिक्रियेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली असून रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जाणार असून याठिकाणी अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध असलेला हे सेंटर आहे. यात ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली असून ५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉईंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790