नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत महापालिकेने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. कमी दरात वीस चार्जिंग स्टेशनचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे उरलेल्या रकमेतून आणखीन नऊ चार्जिंग स्टेशन उभारणीचा निर्णय विद्युत विभागाने घेतला असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत (एन-कॅप) महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून शहरातील रस्ते झाडले जात आहे. सायकल, विद्युतदाहिनी त्याचप्रमाणे वाहतूक बेटामध्ये झाडे लावणे आदी उपक्रम राबविले जात आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करण्याच्या उद्देशाने चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या निधीतून शहरात वीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. सर्वेटीक पॉवर सिस्टीम लिमिटेड या कंपनीला स्टेशन उभारणीचे काम देण्यात आले आहे. महापालिकेच्या प्राकलन दरापेक्षा जवळपास २५ टक्के कमी दर आल्याने सात कोटी ४३ लाख रुपयांमध्ये वीस चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम देण्यात आले आहे.
दहा कोटींपैकी २ कोटी सत्तावन्न लाख रुपये निधी बचत झाल्याने त्या निधीतून शहरात नव्याने नऊ चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्यात आला आहे.
प्रस्तावित चार्जिंग स्टेशन:
सदाशिव मोरे नाट्यगृह हिरावाडी.
कालिकानगर आरोग्य केंद्र.
शिवनगर महापालिका क्रीडांगण.
महापालिका शाळा कामटवाडा.
शुभम पार्क सर्व्हे क्रमांक २९६ चर्चजवळ सिडको.
सोमाणी उद्यान नाशिक रोड
निसर्गोपचार केंद्रालगत जयभवानी रोड.
वडनेर रोड पाण्याच्या टाकीजवळ, विहीतगाव.
![]()

