नाशिक: पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र दोघांनी खेचले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्यात आले. स्वराजनगर, इंदिरानगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: APK फाईल डाऊनलोड करताच व्यावसायिकाची १.६९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पोलिसांनी दिलेली माहिती आणि मंगल पाटील (रा. पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सायंकाळी पायी घराकडे जात असताना दुचाकीने आलेल्या दोघांनी पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. याप्रकरणी इंदिरानगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790