नाशिक: शहरात दोन ठिकाणी सोनसाखळी लुटीच्या घटना

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अंबड परिसरात दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटीच्या घटना घडल्या. पांगरेनगर आणि शिवपुरी चौक उत्तमनगर येथे या दोन घटना घडल्या.

अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि निता सोनवणे (रा. सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाच्यासोबत पायी घराकडे येत असताना लाल, काळ्या रंगाच्या दुचाकीहून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

ही घटना ताजी असताना शिवपुरी चौक येथे राहणाऱ्या योगिता खिस्ते यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दोघांनी खेचून नेले. पाठोपाठ झालेल्या गुन्ह्यामुळे अंबड परिसरात पोलिसांची गस्त होत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790