ठरलं.. या तारखेपासून सुरु होणार शहर बस सेवा ! या मार्गांवर धावणार…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्या पासून सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर बस सेवा सुरू करण्यात येणार असून  अनुषंगाने बांधकाम,गॅस, पुरवठा,मोबाईल ॲप याबाबत चर्चा करण्यात आली.बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने ९० टक्के काम पूर्ण होत आले असून तपोवन आणि नाशिक रोड येथील डेपोचे काम पूर्णत्वाकडे आहे २७ जून ते ३० जून या दरम्यान बसेस सुरू करण्याच्या दृष्टीने ट्रायल घेण्यात येणार आहे.

मनपाच्या वतीने पहिल्या टप्प्यात ५० बसेस सुरू करण्याचा प्रयत्न असून त्या बसेसच्या १) तपोवन ते बारदान फाटा मार्गे सिव्हील,सातपूर अशोकनगर श्रमिकनगर, २) तपोवन सिंबाँयसीस कॉलेज मार्ग पवन नगर उत्तम नगर ३) तपोवन ते पाथर्डी गाव मार्गे द्वारका नागजी, इंदिरानगर, वनवैभव, ४) सिंबाँयसीस कॉलेज ते बोरगड मार्गे शिवाजी चौक लेखा नगर महामार्ग मसरूळ बोरगड, ५) तपोवन ते भगूर मार्गे शालिमार द्वारका बिटको देवळाली कॅम्प, ६) नासिकरोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका कॉलेज रोड सातपूर व्हीआयपी कार्बन नाका, ७) नाशिक रोड ते अंबड गाव मार्गे द्वारका महामार्ग लेखानगर गरवारे, ८) नाशिक रोड ते निमाणी  मार्गे जेल टाकी सैलानी बाबा नांदूर गाव नांदूर नाका तपोवन, ९) नाशिक रोड ते तपोवन मार्गे बिटको द्वारका शालिमार सीबीएस पंचवटी या ९ मार्गावर २४० बस थांबे असणार आहेत.

हे ही वाचा:  नाशिक आयुक्तालय हद्दीत ‘नो फ्लाईंग झोन’ आदेश लागू !

जुलै २०२१ च्या पहिल्या आठवड्या पासून ही बस सेवा सुरू करण्याच्या विचाराधीन असून याबाबतच्या कामकाजाचा २५ जून २०२१ रोजी सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. याबसेस साठी नियुक्त होणारे कंडक्टर व ड्रायव्हर  त्याबाबतचे ट्रेनिंग देण्यात आले आहे.येत्या पंधरा दिवसात उर्वरित लोकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.सिटी बसच्या अहवालानुसार हाय पेयींग रूटवर या बस धावणार आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: मतदान प्रक्रियेत न पुसता येणाऱ्या शाईचे योगदान अमूल्य

भविष्यात शहर बस बरोबरच ओझर विमानतळ,त्रंबकेश्वर , कसारा लोकलला जोडणारी बस सेवा सुरू करण्याचा नियोजन केले जाणार आहे.त्याचबरोबर नाशिक दर्शन सारखे पर्यटन स्थळांवर  व सुला वाईन,बोट क्लब इत्यादी ठिकाणी लवकरच रूट तयार करून बस सुरू करण्याचा विचार आहे. नाशिक महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तपोवन व नाशिकरोड डेपोच्या आवारात शॉपिंग मॉल उभारण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती आयुक्त  कैलास जाधव यांनी दिली.बस सेवे संदर्भात झालेल्या आढावा बैठकीस मा.शहर अभियंता संजय घुगे,कार्यकारी  अभियंता एस.एम चव्हाणके, कार्यकारी उदय धर्माधिकारी, बाजीराव माळी  मिलिंद बंड, वसंत गायधनी,रणजीत ढाकणे आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790