नाशिक: सातपूर MIDCमध्ये कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील सातपूर MIDC भागातील एका कंपनीत आज मोठी आग लागली. आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या घटनेत कोणी जखमी झालंय किंवा जिवितीहानीबद्दलही माहिती समोर आलेली नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसातहीत कंपनी आहे. या कंपनीत भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं. आगीचा भडका उडाल्यानंतर धुराचे लोट परिसरात पसरले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

आग लागल्याची माहिती समजतचात अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, आगीची घटना घडताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केलीय. आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सहा अग्निशमन बंबांच्या मदतीने अर्धा ते पाऊण तासात अग्निशमन दलाने पूर्णपणे आटोक्यात आणली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790