नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय ४०) यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नजन हे सकाळी नेहमीप्रमाणे साडे नऊच्या सुमारास पोलीस ठाण्यात आले. केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास सुरु आहे.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790