Amazon

नाशिक: संतापजनक; नात्याला काळिमा… बापाकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शिंदे गाव परिसरात घडली आहे. बापाने आपल्या ९ वर्षीय मुलीवर एक आठवडा लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी बापाने आपल्या ९ वर्षीय मुलीवर १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान ४ ते ५ वेळा त्यांच्या राहत्या घरी लैंगिक अत्याचार केले.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे करीत आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५५१/२०२४)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790