नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे काही तास शिल्लक आहेत. आज (दि. १८ नोव्हेंबर) संध्याकाळी सहा वाजल्यानंतर प्रचाराच्या थोफा थंडावतील.
त्यानंतर छुपा प्रचार सुरु होईल, त्यावर आयोगाची करडी नजर असेल. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये मोठी घडामोड घडली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारलाय.
यामध्ये तब्बल २ कोटींपपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाय एका इसमासह गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून नाशिकमधील मुंबई आग्रा रोडवरील एका नामांकित हॉटेलवर आज छापा मारण्यात आला. या छाप्यात कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले.
त्याशिवाय एका इसमासह गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास अद्याप सुरु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे.
इतकी मोठी रक्कम कुठून आणि का आणली? हे पैसे कुणी दिले? कशासाठी दिले? यासारख्या प्रश्नांची पोलिसांकडून सरबत्ती कऱण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला इसम कोणत्या राजकीय पक्षाशी निगडित आहे, याचीही चौकशी करण्यात येत आहे.