नाशिक: अमेरिकन नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश !

नाशिक (प्रतिनिधी): अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल कंपनीच्या नावाने फोन करून वेगवेगळी कारणे सांगून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा नाशिक शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली आहे.

दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्याला गोपनीय लेखील तक्रार प्राप्त झाली होती की, अश्विन नगर, नाशिक या परिसरामध्ये परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकामध्ये बिघाड करून तो दुरूस्ती करण्याचे नावाखाली २०० ते २००० डॉलर वसुल करणाऱ्यासाठी कॉल सेंटर सुरू आहे.

सदर मिळालेल्या माहितीनुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषन करून जागा निश्चीत करण्यात आली. अत्यंत गोपनीयरित्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २२.३० वाजता प्लॉट नंबर ६६, जानकी बंगला, भुमी अपार्टमेंटसमोर, अश्विन नगर, नाशिक येथे दोन लायक पंचांसह जावून पाहणी करण्यात आली.

सदर बंगल्यामध्ये प्रथम मजल्यावर जावून पाहणी केली असता लक्षात येणार नाही, अशा प्रकारे दरवाजा असलेल्या ठिकाणी शोध घेण्यात आला. तसेच आत देखील बुक शेल्फ वाटेल असा दरवाजा बनवून त्याठिकाणी शोध लागणार नाही अशी व्यवस्था केलेली होती. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षक करून तो दरवाजा शोधून काढला. आत पाहणी केली असता पाच पुरूष व एक महिला १२ लॅपटॉप, सर्वर व १३ मोबाईलसह कॉल सेंटर चालविताना दिसून आले.

हे ही वाचा:  नाशिक: स्वाधार योजनेच्या अर्जासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

त्यांची चौकशी केली असता लक्षात आले की ते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकावर मायक्रोसॉफ्ट व अ‍ॅपल या कंपनीकडून आलेले असे भासणारे संगणकामध्ये बिघाड झाल्याचे अथवा गंभीर व्हायरस  आल्याचे नोटीफीकेशन पाठवित होते. त्यामध्ये त्यांना +१८४४८४४९७३६ या फोन क्रमांकावर फोन करण्याचे सांगत कॉलसेंटरमधुन संगणकामधील बिघाड दुर करण्याकरिता २०० ते २००० डॉलर्सचे गिफ्ट व्हाऊचर्स जवळच्या दुकानातुन खरेदी करण्यास व त्या व्हाऊचरवरील क्रमांक कळविण्यास व्हीओआयपी कॉलवरून सांगत होते. अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर २०२३ ते आजपावेतो सुमारे १००-१५० अमेरिकन नागरिकांची अंदाजे २,४०,००० डॉलरची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले. भारतीय चलनात हे रक्कम किमान २ कोटी रुपये इतकी होते.

याप्रकरणी पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल, सर्वर व रोख रक्कम रू.४७,६००/- इत्यादी यांची नोंद घेवून पंचनामा करण्यात आला. तेथे काम करणाऱ्या सर्व इसमांना ताब्यामध्ये घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हे ही वाचा:  नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान महत्वपूर्ण- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

सदर बाबत सरकार तर्फे सायबर पोलीस ठाणे गु. र. क्र. १८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३६ (२) ३३६ (३) ३३८, ३१८ (४) ६१ (२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६५, ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्हयामध्ये पुढील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१. प्रणय अनिरुध्द जैस्वाल (वय ३० वर्षे, राह. नालासोपारा पुर्व, पालघर), २. साहिल खोकोन शेख (वय २४ वर्षे, राह. मालाड पश्चिम, मुंबई.), ३. मुकेश गजानन पालांडे (वय ४० वर्षे, राह. नालासोपारा पुर्व, पालघर), ४. आशिष प्रभाकर ससाणे (वय २८ वर्षे, राह. सांताक्रुझ पुर्व, मुंबई), ५. चांद शिवदयाल बर्नवाल (वय २७ वर्षे, राह. मीरा रोड पुर्व, ठाणे), ६. सादिक अहमद खान (वय २४ वर्षे, राह. मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई) आणि ७. समिक्षा शंकर सोनावले (वय २४ वर्षे, राह. खर्डीपाडा, ठाणे). सदर आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: नव तेजस्विनी महोत्सव 2025 प्रदर्शनाच्या प्रचार प्रसिद्धी वाहनास झेंडा दाखवून उदघाटन

याप्रकरणी संशयित आरोपी बिपीन साहु व रॉन उर्फ शादाब हे पाहिजे आरोपी असून ते सदर गुन्हयातील फसवणूक झालेल्या रकमेचे व्यवस्थापन करीत होते. तसेच त्यांचेकडे असलेली तांत्रीक पथक हे अमेरिकेतील नागरिकांची वर नमुद केल्याप्रमाणे फसवणूक करीत होते.

सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक निरीक्षक प्रतिक पाटील व सहायक पोलीस निरीक्षक धिरज गवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके, पोलीस हवालदार: मनिष धनवटे, मनोज पाटील, पठारे, पोलीस शिपाई विकास पाटील यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790