NC

नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील जकात नाका भागात झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिपक लक्ष्मण गांगुर्डे (रा.लिंबोळे ता.चांदवड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गांगुर्डे शुक्रवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर नाशिककडून पिंपळगावच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दहावा मैल भागतील जकातनाका परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक

या अपघातात गांगुर्डे गंभीर जखमी झाले होते. गणेश पालवे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790