नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वडाळागावातील सावित्रीबाई फुले नगर भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंकुश पुंजाराम करके असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. करके गेल्या शनिवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास आपल्या घरपरिसरात दुचाकीवर प्रवास करीत असतांना अचानक दुचाकी घसरली होती.
या अपघातात त्याच्या डोक्यास दुखापत झाल्याने भाऊ पंढरीनाथ करके यांनी त्यांना तातडीने लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता बुधवारी उपचार सुरू असतांना डॉ. भुषण देशमुख यानी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790