नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड परिसरातील बंगाली बाबा भागात भरधाव बसने दिलेल्या धडकेत ४१ वर्षीय पादचारी ठार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक तानाजी सोनवणे (४१ रा.देवळी ता.चाळीसगाव जि.जळगाव) असे बसच्या धडकेत ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. सोनवणे शनिवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास बंगाली बाबा येथील विसावा हॉटेल समोरून पायी जात असतांना त्यांना बाबा चौधरी इमारत परिसरात भरधाव एमएच २० बीएल ३३११ या एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात सोनवणे यांचा मृत्यू झाला.
याबाबत संदिप फणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक संजय लक्ष्मण भाबड (रा.चास ता.सिन्नर) यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.