नाशिक (प्रतिनिधी): कार-दुचाकी अपघातप्रकरणी कारचालक महिलेच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी गंगापूररोडवरील सोमेश्वर फाट्याजवळ हा अपघात घडला होता. पोलिसांनी कारचालक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरेश वसंतराव वाखरकर व त्यांची पत्नी विद्या वाखरकर हे दांपत्य एमएच १५ जीडब्ल्यू ४२९४ या दुचाकीने नाशिककडे गंगापूररोडकडून येत असताना गंगापूरकडे जाणारी एमएच १५ जीएम ००६६ या क्रमांकाच्या कारच्या महिला चालकाने भरधाव वेगात वळण घेत दुचाकीला धडक दिली.
यात सुरेश वाखरकर (वय: ६४, रा.) जागीच ठार झाले तर गंभीर जखमी विद्या वाखारकर (वय: ६०, दोघे रा. शारदा सोसायटी, लक्ष्मी नगर, अमृतधाम, पंचवटी) यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित कारचालक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. संशयित स्मिता रासकर (५०, रा. जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक) असे या कारचालक महिलेचे नाव आहे. (गंगापूर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८९/२०२४)