HomeAd

नाशिक: कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावरील ट्रॅक्टर शोरूमसमोर भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. तर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पुखराज आयंदजी प्रजापती (४०, रा. ओझर ता. निफाड) असे मृतदुचाकीस्वाराचे नाव आहे. हिरालाल मोडाराम गुज्जर (रा. सदर) हे गंभीर जखमी आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आज पावसाचा 'ऑरेंज', तर गुरुवारपर्यंत 'यलो' अलर्ट !

याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिस शिपाई मधुकर सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रजापती व गुज्जर हे दोघे गुरूवारी (दि.२४) रात्री नाशिककडून ओझरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: वाहन फोडून रोख रक्कम चोरीप्रकरणी आंतरराज्य टोळी जेरबंद; 5.59 लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

टॅक्टर शोरूम परिसरात पाठीमागून भरधाव येणा-या एमएच ४१ बीएच ८४८४ या थार कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात प्रजापती यांचा मृत्यू झाला असून गुज्जर गंभीर जखमी आहेत. अधिक तपास हवालदार एच.डी.देवरे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790