HomeAd

नाशिक: घंटागाडीखाली सापडून मोपेडस्वार महिला प्राध्यापिका ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुली येथे पाठीमागून आलेल्या घंटागाडीने मोपेडला जोरदार धडक दिली असता, मोपेडस्वार महिला रस्त्यावर पडली आणि घंटागाडीच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने तिचा करूण अंत झाला. मयत महिला ही के. के. वाघ महाविद्यालयाची प्राध्यापिका असून, याप्रकरणी संशयित घंटागाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: महिलांच्या तक्रार निवारणासाठी राज्य महिला आयोग सदैव कटिबद्ध- रूपाली चाकणकर

प्रा. विनिता रामचंद्र कुयटे (२७, रा. मखमलाबाद रोड) असे मयत मोपेडस्वार महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना शनिवारी (ता. २४) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

प्रा. विनिता कुयटे या त्यांच्या मोपेडवरून (एमएच १५ डीजी १२६१) शनिवारी (ता.२४) सकाळी सरस्वती नगर परिसरात असलेल्या के. के. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाल्या. महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर त्या वळण घेत असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या घंटागाडीने त्यांच्या मोपेडला धडक दिली.

👉 हे ही वाचा:  कर्मयोगी नगरमधील रस्त्याचा गायब झालेला निधी पुन्हा देणार; आयुक्तांचे ‘शिवसेना-सत्कार्य’ला आश्वासन

या अपघातात त्या मोपेडवरून खाली पडल्या आणि घंडागाडीच्या चाकाखाली सापडल्या. घंटागाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. ३१ मे) दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार !

मयत प्रा. कुयटे यांनी डोक्यात हेल्मेटही घातलेले होते. कुयटे या अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात घंटागाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790