नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): भरघाव जाणाऱ्या कारने रोहाउसला घडक दिल्याने झालेल्या अपघातात रो- हाऊसचे कुंपण आणि पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. या धडकेत कारचालक जखमी झाला आहे.
सुदैवारी रात्रीची वेळ असल्याने बाहेर कोणी नसल्याने जीतितहानी टळली. कामटवाडा, डीजीपीनगर नं. २ येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक तळेल (रा. कामटवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री घरात झोपलो असताना बाहेर मोठा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले असता एमएच ०१ बीएफ ३१९८ या क्रमांकाच्या कारने रो हाऊसच्या कुंपणाला धडक दिल्याने कुंपण आणि बाहेरील पत्र्याचे शेड कोसळल्याचे दिसले. चालकाच्या डोक्यास गंभीर मार लागल्याचे निदर्शनास आले. संशयित कारचालक गणेश फोकणे याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३७९/२०२४)
चालकाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी:
चालकावर उपचार सुरू आहेत. त्याचे रक्ताचे वे नमुने घेतले असून फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. संशयिताविरोधात गुन्हा दाखल आहे.
– दिलीप ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक, अंबड पोलिस