नाशिक: गंगापूर रोडवर कारचा भीषण अपघात; दोन ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुण व तरुणी जागीच ठार झाले. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी (दि. २६) रात्री गंगापूररोडवर बारदान फाटा येथे हा भीषण अपघात झाला. गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्यन फडकर (१८, रा. मखमलाबाद), मृण्मयी आहिरे (रा. हिरावाडी), रिद्धी प्रशांत गुजराथी (१८, रा. परमानंद निवास, खोडेनगर, हिरावाडी) आणि नीरज रवींद्र धारणकर (१८, रा. काठे गल्ली, द्वारका) हे चौघे मित्र बारावीची परीक्षा संपल्यानंतर एमटीडीसीच्या बोट क्लब येथे एमएच १२ एनबी १४५८ कारमधून फिरण्यास गेले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

सायंकाळी घरी परतताना बारदान फाट्याच्या साधारण पन्नास मीटरच्या मागे त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून दोन ते तीन वेळा पलटली. कारचे पुढचे टायर फुटून झाडावर आदळली. मागील सीटवर बसलेले रिद्धी व नीरज यांच्या डोक्यास, पोटास गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

रिद्धी फॅशन डिझायनर होती. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ आहे. तर नीरजच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ आहेत. आर्यन व मागे बसलेली मृण्मयी गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790