नाशिक: स्कूल बसच्या धडकेत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे दुचाकी व शाळेच्या बस मध्ये झालेल्या भीषण अपघातात अठरा वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेचे दागिने लांबवले

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी (दि. २६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीहून दिव्या ऍडलॅब कडून त्रिमूर्ती चौक रस्त्याकडे मयूर दत्ता गुंजाळ (१८,महाले फार्म राणाप्रताप चौक सिडको) हा त्याच्या इलेक्ट्रिकल बाईक वरून जात असतांना यावेळी येथूनच जाणारी एका खासगी शाळेची बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने अपघात झाला.

🔎 हे वाचलं का?:  ग्रेट व्हाइट पेलिकन (रोजी पेलिकनचे) नांदूर मध्यमेश्वरमध्ये आगमन; महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक घटना

यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक रहिवासीयांनी मयूर गुंजाळ यास त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालावली. याबाबत अंबड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790