नाशिक: म्हसरुळला सिटीलिंक बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

नाशिक। दि. २० मार्च २०२६: भरधाव वेगाने विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेलेल्या सिटीलिंक बसने सायकलस्वारांना दिलेल्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना किशोर सूर्यवंशी मार्गावर घडली. या अपघातात दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरदिवसा घरफोडीत ६.७४ लाखांचा ऐवज लांबवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता संकेत नागोजी गवळी आणि त्याचा मित्र आर्यन संदीप वाघमारे हे दोघे सायकलवरून किशोर सूर्यवंशी मार्गाने जात होते. त्याचवेळी कन्सारा चौकाकडून ओमकार चौकाच्या दिशेने (एमएच १५ जीव्ही ७९४४) क्रमांकाची सिटीलिंक बस वेगात येत होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत शनिवारी (दि. २१) महत्वाचे बदल…

बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन विरुद्ध लेनमध्ये गेले आणि सायकलस्वारांना जोरदार धडक बसली. या धडकेत संकेत गवळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आर्यन वाघमारे याच्यावर गंभीर जखमांमुळे उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी नागोजी सखाराम गवळी यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. मद्रूपकर करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790