नाशिक । दि. १८ डिसेंबर २०२५ : रस्त्याच्या कडेला ‘नो पार्किंग’ क्षेत्रात निष्काळजीपणे उभ्या केलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबड येथील एक्स्लो पॉइंटजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्मेष शांताराम वळवी (वय: २१, रा. दत्तनगर, कारगिल चौक, चुंचाळे) व त्यांचा मित्र प्रकाश हिरालाल वळवी (वय: २३) हे एमएच ३९: एआर १०८२ या क्रमांकाच्या दुचाकीने त्रिमूर्ती चौकातील मित्राच्या घरी जेवणासाठी जात होते. अंबड एक्स्लो पॉइंटजवळ महिंद्रा कंपनीच्या गेटजवळील वळणावर ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या चुकीच्या पद्धतीने उभ्या असलेल्या एमएच १५: सीयू २८२८ क्रमांकाच्या ट्रकला दुचाकी धडकली.
या अपघातात प्रकाश हिरालाल वळवी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा १३ डिसेंबर २०२५ रोजी रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात १६ डिसेंबर २०२५ रोजी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर, अंबड व रिंगरोड परिसरात अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे गेल्या महिनाभरात हा चौथा बळी ठरला असून, संबंधित रस्ते मृत्यूचा सापळा बनत असल्याची नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ९३३/२०२५)
![]()

