नाशिक। दि. १७ ऑगस्ट २०२५: आडगाव नाक्याकडून द्वारकेकडे जाणाऱ्या दुचाकीला कन्नमवार पुलाजवळ शुक्रवारी (दि.१५) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील कोणार्कनगरजवळ भरधाव एसटी बसने धडक दिली.
या धडकेत दुचाकीचालक युवक नितीन विष्णू ढगे (३५, रा. बेळगाव ढगा, त्र्यंबकरोड) हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर प्रवास करत होते. यादरम्यान बसने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बसचालक जयदेव राजाराम तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: २८७/२०२५)
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790