नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोडवरील आनंदवल्ली येथे भरधाव वेगातील मालवाहू वाहनाच्या धडकेत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एक जण ठार झाला. तर, अंबड औद्योगिक वसाहतीतही कारच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर, अंबड पोलिसात कारचालकांविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गंगापूर रोडवरील आनंदवल्ली येथील अपघातात सुजित रमेश चंद्रमोरे (२९, रा. पळसे राजवाडा, नाशिक) असे मयताचे नाव आहे. राजेंद्र निवृत्ती जाधव (रा. जलालपूर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित शरद नाना पाटील (२२, रा. कामगारनगर, सातपूर) याने भरधाव वेगातील मालवाहू वाहनाने भरधाव वेगात चालवून बुधवारी (ता. १५) दुपारी एक वाजता रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या सुजित यास धडक दिली.
यात तो गंभीर जखमी होऊन मयत झाला. धडकेत दोन दुचाक्यांचेही नुकसान झाले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, अंबड औद्योगिक वसाहतीतील कोका कोला कंपनीजवळ झालेल्या कार अपघातामध्ये पादचारी ठार झाला. संजय कारभारी आंबेकर (५४, रा. साईकृपा रो हाऊस, दामोदर चौक, पाथर्डी फाटा) असे मयत पादचार्याचे नाव आहे. ऋषिकेश संतोष महाले (रा. साईनाथ कॉलनी, नांदूर नाका) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता.१४) रात्री आठ वाजेच्या सुमारास आंबेकर हे पायी जात असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली यात ते गंभीररित्या जखमी झाल्याने मयत झाले. याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यातआला आहे.