नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

नाशिक। दि. १५ सप्टेंबर २०२५: शहर व परिसरात अपघातांची मालिका सुरू असून रविवारी मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संत कबीर नगर येथील अर्चना संतोष आठवणे (२४ रा. मांगीर बाबा चौक) ही युवती रविवारी (दि. १४) सायंकाळच्या सुमारास समर्थ नगर कडून जेहान सर्कलच्या दिशने पायी जात असतांना लींबूज हॉटेल समोरील भोसलाच्या गेट समोर तिला भरधाव मोटारसायकल (क्र. एमएच ४१ बीबी ७७७६) या दुचाकीने धडक दिली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: धोकादायकरीत्या उभ्या ट्रकला कारची धडक; तीन वर्षांच्या चिमुकलीसह चौघे जखमी

या अपघातात युवती गंभीर जखमी झाल्याने तिला समाजसेवक राहूल भुजबळ यांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत. (गंगापूर पोलीस स्टेशन, अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: ९३/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790