नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आडगाव शिवारातील हनुमान मंदिर भागात भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. नाना जानकीराम माळी (रा.म्हाडा कॉलनी,आडगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
🔎 हे वाचलं का?: कुंभमेळा २०२७: विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक
माळी गेल्या रविवारी सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर महामार्गाने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. हनुमान मंदिर परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने माळी गंभीर जखमी झाले होते.
कुटूंबियांनी त्यांना तातडीने आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. मानसी चौधरी यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

