नाशिक (प्रतिनिधी): दुचाकी अपघातात डबलसिट प्रवास करणारा सिडकोतील २० वर्षीय युवक ठार झाला. हा अपघात महामार्गावरील बळी मंदिर परिसरातील सर्व्हीस रोडवर झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव ज्ञानेश्वर पाटील (रा.राजरत्ननगर पवननगर सिडको) असे मृत युवकाचे नाव आहे. गौरव पाटील हा गेल्या २ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास मित्र संशयित जयेश शरद मंडलिक याच्या बुलेटवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. भरधाव दुचाकीचा अपघात झाल्याने गौरव पाटील गंभीर जखमी झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.
याबाबत वडिल ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चालक संशयित जयेश मंडलिक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५१/२०२५)