नाशिक: भरधाव सिटीलिंक बस आदळली ट्रकवर; बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक। दि. ११ ऑगस्ट २०२५: अंबड लिंकरोडने त्रिमूर्ती चौकातून सुसाट येणारी सिटीलिंक बस (क्र. एमएच १५ जीव्ही ८०७१) उंटवाडी सिग्नल येथे अवजड ट्रकवर (क्र. एचआर ५५ एएल ३२७७) येऊन आदळली. हा अपघात रविवारी (दि.१०) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडला. बसचा वेग इतका होता की संपूर्ण कंटेनरला बस घासत पुढे गेल्याने बसच्या सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या.

👉 हे ही वाचा:  नाशिक: आनंददायी आणि सुरक्षित कुंभकरीता प्रशासन प्रयत्नशील- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

सुदैवाने यावेळी बसमध्ये प्रवासी नव्हते अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

झाले आहे. या अपघातावरून पुन्हा एकदा सिटीलिंकच्या बसचालकांचा बेशिस्तपणा समोर आला आहे. याप्रकरणी बसचालक संशयित संतोष यमाजी भवर (रा. देवळाली कॅम्प) याच्याविरोधात ट्रकचालक पवनकुमार जोगेंद्रसिंग (रा. उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गंगापूर पोलिस करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790