नाशिक। दि. ११ जुलै २०२५: सातपूर-त्र्यंबक रोडवर पिपंळगाव बहुला येथे धोकादायक अवस्थेत बेकायदेशीर पार्किंग केलेल्या कंटेनरवर पाठीमागून दुचाकी आदलल्याने बुधवार सायंकाळी ६.३० वाजता तरुण गंभीर जखमी झाला. दरम्यान जिल्हा रुग्णालय या युवकाला दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
पिंपळगाव बहुला येथे भावले वस्तीजवळ कंटेनर (एनएल ०१ एजी ८८०६) बेकादेशीरपणे पार्किंग का होता. कंटेनरवर सौरभ मुळाणे (वय: २६, राहणार: पिंप्री पो. माळेगाव, तालुका: त्र्यंबकेश्वर) हे आपल्या दुचाकीने (एमएच १५ एचएल ०१२७) त्र्यंबकेश्वरकडे जाताना पाठीमागून धडकले. यात ते जखमी झाले होते. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारदरम्यान त्यांस डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक: ९१/२०२५)
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790