नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): येथील बिटको चौकातील पवन हॉटेलसमोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकरोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवनसमोर एक तरूणी काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार येथून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी नाशिककडून सिन्नरकडे जाणाऱ्या (एनआय ०१ ए.सी. १०५१) या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात तरूणीच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली.
पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पवन हॉटेलसमोर नाशिककडून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बस थांबत असल्याने वाहतूकीची मोठी कोंडी होते. जेलरोड तसेच दत्त मंदिर सिग्नल वरून रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने मोठ्याप्रमाणात असल्याने मोठी गर्दी आणि कोंडी या ठिकाणी निर्माण होत असते. तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहे.