नाशिक: भरधाव दुचाकी कंटेनरवर आदळल्याने २२ वर्षीय युवक ठार

नाशिक। दि. ६ ऑगस्ट २०२५: मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर धोकादायक पद्धतीने भरधाव दुचाकी दामटवत कंटेनरवर पाठीमागून जाऊन आदळल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय काळू पवार (२२, रा. दत्तनगर) असे मृत्य युवकाचे नाव आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

दुपारच्या सुमारास इंदिरानगरकडून उड्डाणपुलावरून रविवारी (दि.३) पाथर्डी फाट्याच्या दिशेने सुसाट धोकादायक पद्धतीने पल्सर दुचाकी (एम.एच१८ सीएफ ३९६०) चालवत असताना दुचाकीवरील पवार याचे नियंत्रण सुटले. दुचाकी पुढे चालत असलेल्या कंटेनरवर पाठीमागून जाऊन आदळली. पवार याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यास उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पवार यांचा मृत्यू झाला. (अंबड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५१९/२०२५)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790