नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या घंटागाडीस पाठीमागून भरधाव आलेल्या रिक्षाने दिलेल्या धडकेत रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना तपोवन रोड येथे घडली.
याबाबत सागर राजू जाधव (रा. मनपा बिल्डिंग, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की विजय हरी गायकवाड (वय ५०, रा. वास्तुरंग सोसायटी, अष्टविनायकनगर, पेठ रोड, नाशिक) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा भरधाव वेगाने घेऊन जात होते.
त्यावेळी तपोवन कॉर्नर येथील रोडवर घंटागाडी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्यावेळी भरधाव आलेल्या रिक्षाने घंटागाडीस पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात अपघात होऊन रिक्षाचालक विजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजोळे करीत आहेत.