नाशिक। दि. ४ सप्टेंबर २०२५: आरटीओ कॉर्नरकडून रासबिहारी लिंकरोड, गायत्री नगरमध्ये पोकार भवनसमोर हितेश पाटील (२७, रा. साईनगर, आरटीओ कॉर्नर) याच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती आणि नितीन पाटील यांच्या तक्रारीनुसार हितेश रात्री ११ वाजता हा एमएच १५ एफवाय २९३९ वरून आरटीओ कॉर्नरकडून गायत्रीनगरकडे जात असताना पोकार भवनसमोर अनोळखी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. हितेशला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. (पंचवटी पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३७/२०२५)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790