नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाट्यालगत समांतर रस्त्यावर कार व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीस्वार विजय धोंडीराम सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय धोंडीराम सूर्यवंशी (३३) रा. म्हाडा बिल्डिंग, पाथर्डी फाटा हे बुधवारी (दि. ३०) रात्री साडेनऊ वाजता विजयनगर येथील होलसेल दुकानात किराणा माल भरण्यासाठी गेले होते. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास किराणा देऊन विजय एमएच १५ सीबी ३८६५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून राणे नगरकडून समांतर रस्त्यावरून पाथडी फाट्याकडे जात होते, त्याचवेळी पाथर्डीं फाट्याकडून राणे नगरकडे चारचाकी होंडा अमेझ क्रमांक एमएच १५ एचसी ३६४० वरील चालकाने विजय यांच्या दुचाकीस समोरून धडक दिली.
विजय यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. दोन्ही पाय फॅक्चर झाले. जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला विक्रम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १३९/२०२५)
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790