HomeAd

नाशिक: भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने २५ वर्षीय तरुण जागीच ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील भगतसिंगनगरकडे जाणा-या मार्गावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने २५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  कर्मयोगी नगरमधील रस्त्याचा गायब झालेला निधी पुन्हा देणार; आयुक्तांचे ‘शिवसेना-सत्कार्य’ला आश्वासन

नितीन शामराव रोहिमल (रा.गौतमनगर,गरवारे कंपनीसमोर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नितीन रोहिमल ३१ डिसेंबरच्या रात्री आपल्या पल्सर (एमएच १५ जे. बी. ७३२३) दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: घरफोडीच्या गुन्ह्यातील चार संशयित जेरबंद

द्वारका कडून तो विल्होळीच्या दिशेने जात असतांना भगतसिंगनगरकडे जाणाºया रस्त्यावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिस शिपाई सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790