नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. 8 जून) रात्री पुन्हा नव्याने 17 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याआधी 3 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या: ४४७, एकूण मृत्यू: २१, घरी सोडलेले रुग्ण: १६३, उपचार घेत असलेले रुग्ण: २६३ अशी झाली आहे. जाणून घेऊया नवीन कोरोनाबाधित रुग्णांची सविस्तर माहिती.
अमरधाम रोड द्वारका येथील ४३ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
अमरधाम रोड कुंभारवाडा येथील ३४ वर्षीय महिला, ८० वर्षीय वृद्ध महिला व ३६वर्षीय व्यक्ती व १५ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
अमरधामरोड, साईबाबा मंदिर येथील ६ महिन्याच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
पंडित नगर सिडको येथील १८ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
नाईकवाडी पुरा, जुने नाशिक येथील २७ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
सिडको नाशिक येथील ३६ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
पेठरोड, पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.जुन्या रुग्णच्या संपर्कातील आहे.
शितळादेवी मंदिर अमरधाम रोड परिसरातील ८५ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
सुभाष रोड,नाशिकरोड येथील ५५ वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
६९ वर्षीय वृद्ध महिला रा.अजमेरी मजीद, जुने नाशिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
महाराणा प्रताप नगर,पेठरोड येथील ६५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
मेरी दिंडोरी रोड येथील ६० वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
खडकाळी भद्रकाली येथील ४३ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
आझाद चौक जुने नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.
याआधी सोमवारी (दि. ८ जून २०२०) आढळून आलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांबद्दलही जाणून घ्या..