नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबची क्षमता 800 ची आहे. पंरतु तिथे आता ऑटोमॅटिक एक्स्ट्रॅक्शन मशीन स्थापन झालेले असून त्याचे कॅलिब्रेशनचे काम सुरु आहे.
व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर स्वाब टेस्टिंग ची क्षमता 5 हजाराच्यावर जाणार आहे. तसेच बिटको हॉस्पिटल मधील लॅब चे गतीने काम करण्यात येणार आहे. 25 मार्चच्या आत बिटकोची लॅबही सुरु करण्यात येणार आहे. तिची क्षमता 5 हजार असणार आहे.
अशाप्रकारे दिवसाला 10 हजार नमुन्यांची तपासणी करु शकणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच या लॅबची क्षमता वाढल्याने कॉन्टक्ट ट्रेसिंग व स्वॉब तपासणी काम खूप सोपे होणार आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790