नाशिक: सिटीलिंकच्या मार्गात महत्वाचे बदल

नाशिक (प्रतिनिधी): कालिका माता यात्रोत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली. कालिकामाता दर्शनासाठी तसेच यात्रोत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. देवी मंदिर व यात्रोत्सव मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या मार्गातदेखील बदल करण्यात आलेला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नवीन घाटांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करावीत- पालक सचिव एकनाथ डवले

निमाणी बसस्थानकातून सुटणाऱ्या अमृतानगर, अंबड, घरकुल शिवार, उत्तमनगर, जातेगाव नाशिकरोड या बसेस मार्गस्थ होतात. या बसेस या निमाणी, रविवार कारंजा, सीबीएस, गडकरी चौक, चांडक सर्कल, मुंबई नाकामार्गे जाऊन पुढे नियमित मार्गाने मार्गस्थ होतील.

येणाऱ्या बसेस मुंबईनाका, चांडक सर्कल, गडकरी चौक, सीबीएस, रविवार कारंजामार्गे निमाणीकडे मार्गस्थ होतील. १२ ऑक्टोबरपर्यंत वाहतूक मार्गात बदल असेल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790