नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ७ मार्चपर्यंत थकीत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या बस वाहकांनी गत सहा दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे सिटीलिंकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली आहे. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी ठेकेदाराला त्वरित बस रस्त्यावर काढा, अन्यथा कड़क कारवाई करून ठेकाच रद्द करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे.
शहरातील तपोवन डेपो येथील ५० तर नाशिकरोड येथील डेपोतून २० बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सिटी लिंकच्या नाशकात दोन डेपो अंतर्गत सुमारे अडीचशे बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक कामगारांचे वेतन हे डिसेंबर महिन्यापासून थकले असून काहींना अर्थ पेमेंट, काही ना थोड्याशा मुदतीवर आश्वासन देत पुन्हा कार्यरत करण्यात आले होते. या संदर्भात मागील महिन्यातच सिटी लिंकच्या बस वाहकांनी अचानक संप
तपोवन आणि नाशिकरोड डेपो अंतर्गत बसवाहकांना पगार न मिळणे, पगार वेळेवर न मिळणे, टप्प्याटप्प्याने पगार मिळणे अशा अनेक तक्रारीमुळे त्रस्त असलेल्या या सिटीलिंक चालक वाहकांनी आंदोलन केले होते. दोन दिवसाच्या मध्यस्तीनंतर हा संप रात्री मिटण्यात आला होता. यावेळी आंदोलन करत त्यांना मार्च सात मार्चपर्यंत सर्वांचे वेतन खात्यात जमा होतील, असे आश्वासन दिले होते. सात तारखेनंतर जवळजवळ आठवडाभर पुन्हा वाट बघत थकीत वेतन व चालू वेतनही बँक खात्यात जमा न झाल्याने सिटी लिकच्या वाहकांनी काम बंद पुकारले आहे.
पुकारला होता. दहावीच्या परीक्षेच्या काळातच हा संप पुकारल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, महापालिकेने मध्यस्थी करीत या कंत्राटदारांशी बोलून महापालिकेने आगाऊ पेमेंट केले, मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना काही वेतन दिले, तर काहींना न मिळाल्याने त्यांनी काम बंद आंदोलन केले होते.
दरम्यान, सात मार्चपर्यंत सर्वांना वेतन दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र वेतन खात्यामध्ये जमा न झाल्याने १४ मार्च सिटी लिंकच्या वाहकांनी आंदोलनाची भूमिका घेत बसेस बंद केल्या आहेत. तपोवन डेपोतील दीडशे पैकी १४६ तर नाशिक रोड येथील शंभर बसेस पैकी ५० अशा एकूण १९६ बसेस बंद करण्यात आल्या असून हा संपत त्वरित न मिटल्यास अन्य बसेसही बंद केल्या जाणार असल्याचा इशारा सिटी लिंकच्या वाहकांनी दिला आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790