नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या ३ महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे सिटी लिंकने आपल्या बसफेन्यांमध्ये कपात केली होती. मात्र आता शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने सिटी लिंकने बंद केलेल्या ३५ बसच्या ११५ फेल्या १८ जूनपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच जवळपास ३ वर्षांमध्ये १०० कोटी रुपयांच्या तोटा सहन कराव्या लागणाऱ्या सिटी लिंकला पुन्हा आधार मिळणार आहे.
८ जुलै २०२१ पासून सुरू झालेल्या सिटी लिंकला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आधीच अनेक मागाँवर तोटा होत असल्यामुळे बससेवा आर्थिक रुळावर येऊ शकलेली नाही. त्यामध्ये मध्यंतरी वाहक विरुद्ध ठेकेदार या वादात तब्बल नऊ वेळा संप झाल्यामुळे सिटी लिंकचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे २४५ पैकी ३५ बसेसची सेवा २५ एप्रिलपासून बंद करण्यात आली होती.
या बसेस डेपोत उभ्या आहेत. १५ जूनपासून शाळा सुरू होत असून १६ रोजी रविवार व १७ रोजी बकरी ईद असल्याने ८ जूनपासून सिटी लिंकच्या बंद केलेल्या ३५ बसेसची सेवा पूर्ववत सुरू केली जाणार आहे.